मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्येने आज उच्चांकी आकडा पार केला. राज्यात 25 हजार 833 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून याआधी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक 24 हजार 896 रुग्णांची नोंद झाली होती. दिवसभरात 12 हजार 174 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत आज दिवसभरात 2,877 रुग्ण सापडले तर 8 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. 7 ऑक्टोबर 2020 ला कोरोनाचे 2,848 रुग्ण सापडले होते तर 46 जणांचा मृत्यू झाला होता.
मुंबई आणि मुंबईतील मॉलमध्ये आता अँटीजन कोरोना चाचणीच्या निगेटिव्ह रिपोर्टशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबईत येणाऱया ट्रेन आणि इतर गाडय़ांमधून येणाऱया प्रवाशांची कोरोना अँटीजन चाचणी करण्यात येणार आहे.






