मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता बृहन्मुंबई महापालिकेने काही निर्बंध लावायला सुरवात केली आहे. कोविड प्रकरणातील वाढ रोखण्याच्या ताज्या हालचालीत बृहन्मुंबई महानगरपालिकेने शॉपिंग मॉल्समध्ये प्रवेश करण्यासाठी कोविड-19 नकारात्मक अहवाल अनिवार्य केला आहे.
दरम्यान, २२ मार्चपासून नागरिकांना मुंबईतील कोणत्याही मॉलला भेट द्यायची असल्यास त्यांना आपला कोरोना नकारात्मक असल्याचा अहवाल दाखवावा लागणार आहे. संबंधित व्यक्तीकडे नकारात्मक अहवाल नसल्यास त्यांना शॉपिंग सेंटरमध्येचं आपली अँन्टीजेन चाचणी करावी लागेल.
यासाठी मुंबईतील सर्व मॉल्समध्ये लवकरचं रॅपिड अँटीजेन चाचणीची सुविधा उपलब्ध होईल, अशी माहिती बीएमसीने दिली आहे. याच उद्देशाने मॉल्सच्या प्रवेशद्वाराजवळ एक पथक नेमण्यात येईल, असंही बीएमसीने यावेळी स्पष्ट केले आहे.






