मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – भारतीय नौसेनेत मेक इन इंडिया निर्मिती लँन्डिंग क्राफ्ट युटिलिटी एल-५८ नेव्हीमध्ये दाखल लँन्डिंग क्राफ्ट युटिलिटी एल-५८ पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार द्वीप समूहातील दाखल झाली आहे.
नौसेनेत हे दाखल करण्यावेळी कमांडर कृष्ण के. यादव यांनी जहाजापूर्वीच्या कमाडिंग अधिकाऱ्यांच्या रुपात याचे कमीशन वॉरंट वाचले. एल-58 च्या नौसेनेत सहभागी झाल्यानंतर आता भारताकडे कुम्भिर वर्गातील 3 एलसीयू आणि चतुर्थ श्रेणीतील आठ एलसीयू झाले आहेत.

हे जहाज लढाऊ वाहने, युद्धातील टँकसह ९०० टन वजनाचे सामान सुद्धा वाहून नेऊ शकणार आहे. हे जहाज आपल्या चालक दलाव्यतिरिक्त १६० सैनिकांना घेऊन जाण्यास सक्षम असणार आहे.






