होळीसाठी कोकणात जातंय? पाहून घ्या नियम…

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – शिमगोत्सव हा कोकणवासीयांसाठी महत्वाचा आणि मनाचा सण मानला जातो. यंदा या सणासाठी २६ मार्चपासून दररोज ४० गाड्या रत्नागिरीत रवाना करण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ डेपोमधून चाकरमान्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र गेल्याच आठवड्यात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गावात येणाऱ्यांना कोरोना रिपोर्ट बंधनकारक असेल असे आदेश काढले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना गावी जायचं असेल तर कोरोना नेगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक आहे.

चाकरमान्यांसाठी परतीच्या प्रवासासाठीही या गाड्या उपलब्ध असणार आहेत. पालकमंत्री तथा परिवहनमंत्री अनिल परब यांनी चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजन केलं आहे. पण कोरोनाच्या संकटामुळे चाकरमान्यांनी कोकणात येण्याबाबत साशंक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here