मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्याच्या मंत्रालयातील कारभाराचे धिंडवडे काढणारी एक घटना सकाळी घडली आहे. राज्याचा कारभार ज्या ठिकाणाहून चालवला जातो त्या मंत्रालयातच पुन्हा एकदा विद्युतपुरवठा बंद झाला. त्यामुळे मंत्र्यांची बत्ती गुल झाली. अनेक मंत्र्यांची दालने अंधारात होती. मंत्रालयातील एका ‘विद्युत फेज’मध्ये बिघाड झाल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला, अशी सारवासारव प्रशासनातर्फे करण्यात आली.
स्वतः ४८ लाखांची बिले लावून चार्टड विमानाने फिरणारे ऊर्जामंत्र्यांच्या विभागातही अंधःकार असल्याचे दिसून आले. कारण, त्यांच्या राज्यात मंत्रालयात यापूर्वीही १२ जानेवारी रोजी विद्युत यंत्रणा जळल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला होता. यामुळे एकनाथ शिंदेसह अनेक मंत्र्यांची दालने अंधारात होती. वीज नसल्याने अनेक विभागाची कामेही खोळंबली होती. मंत्रालयाच्या जुन्या अनेक इमारतीच्या चौथ्या मजल्यावर हे शॉर्टसर्किट झाले होते. त्यामुळे विद्युत यंत्रणा जळून पुरवठा खंडित झाला. दुरुस्तीचे काम करून अखेर विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात आले होते.
गेल्या वर्षी ३० मार्च, २०२० रोजी व २०१२ रोजी मंत्रालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठं नुकसान झाले होतं. शॉर्टसर्किट होऊन हा अनर्थ टळला, पण मंत्रालयात वायरिंग शॉर्टसर्किट तसेच यंत्रणेवर अतिभार आल्याने अनेक वेळा विद्युतपुरवठा खंडित होतो. मंत्रालयातील वीजपुरवठा खंडित झाला. यानंतर तासाभराने विद्युतपुरवठा सुरळीत झाला; मात्र, विद्युत पुरवठा का खंडित झाला होता. याचे कारण अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, हजारो लोकं आपली काम घेऊन मंत्रालयात येतात आणि हे असं होणं राज्याचा दृष्टीने फार गंभीर आहे .त्यामुळे मंत्रालयातील विद्युत व्यवस्थेकडे नीट लक्ष देणे गरजेचे असल्याचे चित्र सध्या आहे.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अलिशान घराचे फोटो शेअर करून त्यांच्यावर भाजपने निशाणा साधला होता. त्यापूर्वी त्यांनी चार्टड विमानाने प्रवास करुन ४८ लाखांची वीजबिले कंपन्यांना दिली होती. जनतेच्या डोळ्यात अशाप्रकारे धूळफेक करुन डॉ. नितीन राऊत यांनी या सर्व प्रकारांना उत्तर देताना मला ‘लॅव्हीश’ राहायला आवडतं, असे उत्तर दिले आहे.






