देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे – जयंत पाटील

मुंबई प्रतिनिधी (रक्षा गोराटे) – जागतिक निद्रा दिनाचे औचित्य साधून राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट खोचक ट्विट करत केंद्र सरकारला टोला लगावला आहे.

गेल्या दोन महिन्यांहून दिल्लीच्या सीमेवर अधिक काळापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. नवे कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. कडाक्याच्या थंडीतही हे आंदोलन सुरू असून शेकडो शेतकऱ्यांचा आंदोलना दरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र, केंद्र सरकारने त्याकडं दुर्लक्ष केलं आहे.

करोना लॉकडाऊनमुळं देशात बेरोजगारी वाढली आहे. हजारोंच्या संख्येनं तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरचे दर रोजच्या रोज वाढत आहेत. याच अनुषंगाने जयंत पाटील यांनी केंद्र सरकार म्हणजेच मोदी सरकारला कुंभकर्णाची उपमा दिली आहे.

‘शेतकरी आंदोलनात जवळपास ३०० च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत, तरुण रोज नोकरी गमावत आहेत, दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?,’ असा प्रश्न पाटील यांनी ट्वीटमध्ये केला आहे. सोबत #WorldSleepDay असा हॅशटॅगही दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here