एकतर्फी प्रेमाला कंटाळून तरुणीने घेतला गळफास

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – तरुणाच्या एकतर्फी प्रेमाला आणि दबावाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सहकारनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंजुळा संजय पवार ( वय 21 ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. सन्नी पाटोळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तरुणीच्या आईने तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुळा आणि सनी एकाच परिसरात राहण्यास आहेत. आरोपी सन्नीचे मंजुळावर एकतर्फी प्रेम होते. मात्र, मंजुळा त्याला नकार देत होती. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी सनी तिला देत होता. याबाबत कोणास काही सांगितल्यास तुला अन तुझ्या भावाला सोडणार नाही, असेही म्हणत तिच्यावर दबाव टाकत होता.

सततच्या त्रासाला कंटाळून मंजुळाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंजुळाच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here