नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – प्रभाग क्रमांक ९२ सेक्टर २१,नेरूळ येथील रस्त्याच्या मलनिस्सारण्या वाहिन्या या सद्यस्थितीत तुटलेल्या अवस्थेत आहे.
या रस्त्यावरू वरून रोज नागरिकांची व लहान मुलांची ये-जा असते.चुकून कोणाचा तोल गेल्यास तो मलनिस्सारण्या वर पडून गंभीर जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लवकरात लवकर सदर वाहिन्याचे दुरुस्तीचे आदेश संबंधितांना देऊन योग्य ती कारवाई करावी आशा प्रकारचे निवेदन नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस गुरूनाथ नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन दिले.






