पुणे (प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी) – केशवनगर मुंढवा भागात मोठ्या प्रमाणात लोकं वस्ती असल्या कारणाने भाजी मार्केट नसल्या कारणाने नागरिकांना रोड ला भाजी पाला खरेदी करावी लागत आहे. त्यांच्या सोयीसाठी आठवडे बाजार दर गुरुवारी सायंकाळी ४ते 9 वाजे पर्यंत केशवनगर भागात सुरु करण्यात आला आहे.
दर आठवडे बाजार सुरू करण्यासाठी डॉ. दादा कोद्रे सरचिटणीस भाजप हडपसर आकाश भोसले चिटणीस युवा मोर्चा हडपसर प्रवीण देशमुख, मोहम्मद शेख अल्पसंख्याक चिटणीस हडपसर यांनी आयोजन केले होते.

यावेळी सौ. वंदना महादेव कोद्रे पुणे जिल्हा परिषद सदस्य व महिला आघाडी पुणे शहर सागर सोपानराव मारणे कार्याध्यक्ष भाजप युवा मोर्चा मुळशी विकास आप्पा भेगडे राजे प्रतिष्ठाण पश्चिम महाराष्ट्र कामगार सेना अध्यक्ष, संपादक.सुनिल ज्ञानदेव भोसले संपादक.एकता न्यूज स्टार, उपाध्यक्ष.अखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळ महाराष्ट्र राज्य, भूमी जनशक्ती शेतकरी संघटना महासचिव.सौ सुरेखा तुकाराम भोसले,अरबाज शेख भास्कर राउत ओ.बी. सी. चिटणीस पुणे शहर संदिप ओव्हाळ चिटणीस अनुसूचित जाती जमाती पुणे शहर सागर बरदासक सरचिटणीस भाजपा हडपसर अजीज चौधरी सरचिटणीस अल्पसंख्या आघाडी हडपसर अर्जुन खेडकर मा.जी. सैनिक आघाडी हडपसर शेखर पेटकर शारदा पानसरे सरचिटणीस महिला आघाडी हडपसर पुजा कोळवनकर मीरा फडणीस श्वेता सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. योगेश टिळेकर यांनी लोकांना आठवडे बाजाराचा लाभ घेण्याचे आवाहन केले.






