बिग बॉस फेम निक्की तांबोळी कोरोना पॉझिटिव्ह    

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – सामान्य नागरिकांसह बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यातच बिग बॉस- १४ फेम निक्की तांबोळी कोरोना व्हटर्सचा शिकार झाल्याची बातमी समोर आली आहे.

अभिनेत्रीने यासंदर्भात आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून माहिती दिली आहे. कोविडचा अहवाल सकारात्मक झाल्यावर तिने घरी स्वत: ला वेगळे केलं आहे, असेही अभिनेत्रीने सांगितले आहे.

निक्की तांबोळी ने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “आज सकाळी मला कळले की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत: ला वेगळे ठेवलेले आहे आणि आवश्यक त्या सर्व नियमांचे मी पालन करीत आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व औषधे मी घेत आहे. गेल्या काही दिवसात माझ्याशी संपर्क साधलेल्या सर्व लोकांनी त्यांची कोविड चाचणी घ्यावी. तुमच्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मी नेहमीचं आभारी आहे. कृपया स्वत: ची काळजी घ्या, मास्क घाला, आपले हात स्वच्छ करा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here