मुंबई (प्रतिनिधी) – नगर अर्बन बॅंकेकडून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वच कर्ज व्याजदरांमध्ये ०.५०% कपात या गोष्टींचा ग्राहकांना व कर्जदारांना मोठा दिलासा, बँकेकडून मागील एक वर्षांमध्ये कर्जाच्या व्याजदरात तब्बल २.५०% कपात…
१११ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या बँकेच्या निर्णयामुळे लाखो कर्जदारांना याचा फायदा होणार असून, E.M.I च्या अर्थात मासिक हप्त्यावरील रक्कम घटणारतसेच १ ते १० वर्षाचे कालावधीसाठी “अखंड ठेव योजना ” कार्यान्वित करण्यात आलेली असून निर्धारित व्याजदरापेक्षा ०.१५% ते ०.२५% अधिक व्याजदर सदरील ठेवींवर देण्यात येत आहे.
आयकर भरणाऱ्या बँकेच्या सर्व ग्राहक व सभासद व ठेवीदारांना बँकेचे टॅक्स सेव्हिंग सर्टिफिकेटठेव योजनेत गुंतवणूक करून आयकरांमध्ये सवलत मिळवता येईल. याबरोबरच रु १,००,०००/- पर्यंत ठेवींसाठी असलेले विमा संरक्षण आता रु ५,००,०००/- रु पर्यंतच्या ठेवींसाठी वाढविण्यात आलेले आहे.






