मला मोदींचे तोंडही पाहायचे नाही – ममता बॅनर्जी

कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता रंगात येऊ लागली असून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत.

तृणमूलच्या अध्यक्षा-मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या व्हीलचेअरवरूनच प्रचारात उतरल्या आहेत. पूर्व मदिनापूर येथील प्रचार सभेत बोलताना ममता म्हणाल्या, ‘भाजपला निरोप द्या. आम्हाला भाजप नकोय. आम्हाला मोदींचं तोंडही पाहायचं नाही. आम्हाला दंगल, चोर, दुर्योधन, दुःशासन, मीर जाफर नकोय,’ असे म्हणत ममतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राममध्ये जखमी झाल्या होत्या. त्यांच्या जखमी होण्यामागे चौकातील खांबांची भूमिका समोर आली आहे. राज्याच्या फॉरेन्सिक विभागाने नंदीग्राममधील त्या परिसराची पाहणी केली. ज्यामुळे खांबांमुळे ममता बॅनर्जी जखमी झाल्याचं बोललं जातंय त्यांचे निरीक्षण केले गेले. राज्य सरकारचा फॉरेन्सिक विभाग आता निर्जीव खांबांकडून मुख्यमंत्र्यांना झालेल्या दुखापतीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. फॉरेन्सिक विभागाच्या टीमने नंदीग्राममध्ये जाऊन त्या परिसरातील खांबांचे निरीक्षण केले आणि त्यावर खात्याचे स्टीकर लावण्यात आले, असं मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात येतंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here