नवी दिल्ली – बॉक्सर निखात झरीनचा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतील झंझावात शुक्रवारीही कायम राहिला. तिने महिलांच्या 51 किलो वजनी गटात दोन वेळची वर्ल्ड चॅम्पियन नझीम कायझायबे हिला सॉल्लिड पंचेस देत अगदी रुबाबात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.
नझीम कायझायबे हिने 2014 व 2016 साली वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला होता. निखात झरीन हिने नझीम कायझायबे हिला 4-1 अशा फरकाने अगदी सहज पराभूत केले. त्याआधी उपउपांत्यपूर्व लढतीत निखात झरीनने 2019 सालची वर्ल्ड चॅम्पियन पाल्टसेवा एवतेरीना हिला हरवत आगेकूच केली होती. निखात झरीनचे आता या स्पर्धेतील पदक पक्के झाले आहे. दरम्यान, पुरुषांच्या गटात गौरव सोलंकी यानेही उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक पक्के केले आहे.






