जालन्यातील भोकरदन तालुक्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – जालना जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील काही भागांमध्ये अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला आहे.

भोकरदन तालुक्यातील निमगाव कुंभारी, हसनाबाद, तळेगाव, बोरगाव, खडकी, लतीफपूर, विटा, सावखेडा, कोपर्डा, बेलोरा, रजाळा, टाकळी, सोयगाव आदी ठिकाणी जोरदार गारांचा पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपातील काढणीस आलेल्या पिकांचे गहू, हरभरा, मका, करडई आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पंधरा दिवसांपूर्वीच तालुक्यातील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला होता. त्यापाठोपाठ शुक्रवारी पुन्हा गारांचा पाऊस पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here