परभणी – जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातील उक्कडगाव ते वडगावच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व गारांसह मुसळधार पाऊस झाला.
गंगाखेड – परळी या रस्त्यावरील सोनपेठ हद्दीतील उक्कडगावपासून, नैकोटवाडी, करम, ते गंगाखेड पासून दहा किलोमीटर अंतरावरील वडगावपर्यंत पाऊस सुरू होता. तब्बल तीस मिनिटे तास वादळी वारे, गारांचा पाऊस सुरू होता.






