फ्रान्समध्ये तिसरी लाट; महिनाभर लॉकडाऊन

पॅरीस (फ्रान्स) – कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. फ्रान्समध्ये तिसरी लाट आली आहे. पॅरिसमध्ये पुन्हा एकदा एक महिन्याच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून देशातील 15 भागांमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होणार आहे.

घराबाहेर पडण्यासाठी आणि व्यायामशाळेत जाण्यासाठी आवश्यक परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय कोणत्याही नागरिकाला आपल्या घरापासून 10 किमीपेक्षा अधिक दूर जाता येणार नाही.

जिब्राल्टर नावाच्या छोटय़ा देशाने सर्व नागरिकांना कोरोनाची लस देऊन कमाल केली आहे. ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी जिब्राल्टरमध्ये बुधवारी लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले. जिब्राल्टरची लोकसंख्या फक्त 34 हजार असून तेथे 4263 कोरोना रुग्ण सापडले होते. देशातील 94 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here