दत्तात्रेय होसबळेजी रा. स्व. संघाचे नवे सरकार्यवाह

नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबळे यांची निवड करण्यात आली. पुढील तीन वर्षांसाठी ते या पदावर कार्यरत राहतील. रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेमध्ये सर्वानुमते होसबळे यांची निवड करण्यात आली.

रा. स्व. संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बंगळुरू येथे पार पडली. या सभेमध्ये रा. स्व. संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबळे यांची निवड करण्यात आली. ते पुढील ३ वर्षांसाठी पदावर कार्यरत राहतील. त्यांनी १२ वर्षे सरकार्यवाहपदाची धुरा सांभाळणाऱ्या सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांची जागा घेतली आहे.

कोण आहेत दत्तात्रय जी होसबळे?

रा. स्व. संघ परिवारात ‘दत्ताजी’ या नावाने ओळखले जाणारे होसबळे यांचा जन्म 1954 मध्ये कर्नाटक मधील शिमोगा जिल्ह्यातील होसबले या गावी झाला. इंग्रजी विषयातील पदव्युत्तर शिक्षण त्यांनी ग्रहण केले असून 1968 मध्ये तेरा वर्षाचे असताना ते संघस्वयंसेवक बनले आणि 1972 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देशी ते जोडले गेले. विविध जबाबदाऱ्या सांभाळत 11 वर्षे ते अखिल भारतीय संघटन महामंत्री राहिले आहेत.

सण 1975 – 77 आणीबाणीच्या काळात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आणि 14 महिने ‘मिसा’ अंतर्गत कारावासही भोगला.  ते सर्वांत कमी वयाचे ‘मिसाबंदी’ होते. अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना त्यांनी अखिल भारतीय सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी पार पाडली.

त्यानंतर २००४ साली ते रा. स्व. संघाचे सह बौद्धिक प्रमुख म्हणून कार्यरत होते, २००९ साली त्यांच्याकडे रा. स्व. संघाच्या सह सरकार्यवाहपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. संघटनात्मक कार्यासाठी त्यांनी देशभरात विविध ठिकाणी प्रवासही केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here