नागपुरात 31 मार्चपर्यंत लॉकडॉउन; संध्याकाळी चार वाजेपर्यंत बाजारपेठा खुल्या

नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – येथे सुरू असलेल्या लॉकडॉउनला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या काळात शहरातील शाळा बंद राहतील तर काही निर्बंधांसह बाजारपेठा सुरु राहणार आहेत. नागपुरात दुपारी चार वाजेपर्यंत भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली असतील. शहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय घेतला आहे. यापुर्वी शहरात 15 ते 21 मार्च दरम्यान संपूर्ण लॉकडाउन लावण्यात आला होता.

नव्याने जाहिर केलेल्या सुधारित आदेशानुसार शहरातील या काळात सर्व शाळा बंद राहतील तर मुख्य बाजारपेठ फक्त संध्याकाळी चार वाजेपर्यंत खुली राहील. सदरील निर्बंध हे 31 मार्चपर्यंत चालू राहतील. भाजीपाला व इतर आवश्यक दुकाने संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील, असे नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, नागपुरात कुलूपबंद दरम्यान रेस्टॉरंट्स संध्याकाळी 07:00 वाजेपर्यंत खुले राहतील तर ऑनलाइन खाद्यपदार्थ वितरणास रात्री 11 वाजेपर्यंत परवानगी असेल.

त्याबरोबरच नविन आदेशानुसार 31 मार्चपर्यंत शाळा व महाविद्यालये बंद राहतील व नियोजित सर्व परीक्षा कोरोनाचे सर्व नियम पाळून पुर्ण केल्या जातील. शुक्रवारी नागपुरात 3235 नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकुण 35 मृत्यु झाले आहेत. मास्क न घातल्याबद्दल शेकडो व्यक्तींना दंड ठोठावण्यात आला असून लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहनांना ताब्यात घेण्यात आले. संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी आवश्यकतेशिवाय घर सोडण्याचे टाळावे असा सल्ला स्थानिक प्रशासनाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here