सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – शहरात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना करण्यासाठी साहित्य खरेदी करण्यात आले. त्या साहित्याच्या खरेदीमध्ये गौड बंगाल दडले असून आणलेले साहित्य गेले कुठं असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेने कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडय़ा घेतल्या. त्या घंटागाडय़ाना नंबर अजून नाहीत. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा घेतला जात नाही. एकत्र गोळा करून सोनगाव कचरा डेपोत डंप केला जातो.
शहरात कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी गतवर्षी पालिकेने प्रयत्न करायला सुरुवात केली. त्याकरिता साहित्य खरेदी केल्याच दाखवण्यात आले. वास्तविक त्यातील पाहू साहित्य हे शासनाकडून ऑलरेडी येत असते. तर इन 95 मास्क त्या वेळी खरेदी केले गेले कुठं?,कोणाला वाटले याचा कोठेच उल्लेख आढळून येत नाही.त्याच खरेदीमध्ये शववाहिनी खरेदीसाठी 15 ते 20 लाख रुपये, औषध फवारणीसाठी ट्रक्टरसह फवारणी यंत्रणा खरेदी करणे 10 लाख रुपये, आरोग्य कर्मचारी संरक्षक यंत्रणेमध्ये गमबुट, सॅनिटायझर, साबण यासाठी 35 लाख रुपये, कोरोना मृत्यु पावलेल्यावर अंत्यसंस्कार करणाया कर्मचायांना सुरक्षा साहित्यासाठी 10 लाख रुपये, शहरातील सर्व झोपडपट्टीतील नागरिकांना प्रत्येकी दोन मास्क व सॅनिटायझरची बाटली आणि दोन साबण पुरवण्यासाठी 10 लाख रुपये, कोरोना कक्षात संगणक ऑपरेटर पुरवण्यासाठी 2 लाख 50 हजार रुपये, विलीनीकरण कक्ष तयार करण्यासाठी लागणाया कर्मचाऱयाकरता 5 लाख रुपये अशी मागणी करण्यात आली.तत्पूर्वीच आरोग्य विभागाने 32 लाखचे साहित्य खरेदी केले.त्यात पालिकेच्या 20 पथकासाठी 500 फेसशीलड, पॉवर स्प्रे पंप 5, किंग फॉग 40 लिटर, बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल बॅग 5 किलो, अबेट 25, रबरी ग्लोज 500, नॉयलोन क्रबर 100, एन95 मास्क 50, तीन स्तरीय तपासणी मास्क 50, शवपेटी 20, अपॉन कॅप 400 असे साहित्य खरेदी केले होते.तब्बल 80 लाख अपेक्षित खर्च पकडण्यात आला आहे. यामध्ये गौडबंगाल असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.
रस्त्यावर कोणतीही गाडी धावताना त्या गाडीला नंबर आवश्यक असतो परंतु घंटा गाडय़ा घेतल्यापासून विना नंबर फिरत आहेत. तसेच आरोग्य विभागाने एक भाडय़ाची कार घेतली आहे.ती नेमकी कशासाठी?, ती गाडी नेमकी कोठे फिरते, त्या गाडीची नोंद वही आहे का याबाबत ही उलट सुलट चर्चा आहे.






