माजी खा.दिलीप गांधी यांचे पार्थिवास शिर्डी येथे भाजपाचे वतीने आदरांजली

शिर्डी (प्रतिनिधी) – भाजपाचे माजी खा.दिलीप गांधी यांचे दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथे निधन झाले त्यांचे पार्थिव आज शववाहिनीद्वारे शिर्डी मार्गे अहमदनगर येथील त्यांचे निवासस्थानी नेण्यात आले.

त्यावेळी शिर्डी येथे भाजपाचे वतीने नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी पुष्पगुच्छ वाहून त्यांचे पार्थिवाला आदरांजली वाहिली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, युवा मोर्चाचे सचिन तांबे,नगरसेवक रवींद्र कोते,सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी संदीप पारख,श्री साई समर्थ पतसंस्थेचे व्हा.चेअरमन बाळासाहेब ओस्तवाल,भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश जाधव , भाजपा तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर आदींसह शिर्डीतील व्यापारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here