मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबई पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली.
दरम्यान,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडू पत्राबात शंका उपस्थित करण्यात आली होती. परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे , त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता [email protected] असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासू, पण यावर आता परमबीर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना परमबीर सिंग यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवेलं पत्र माझ्याच ई-मेल आयडीवरुन पाठवलं आहे. परमबीर सिंग यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर आता राजकीय वातावणर आणखी तापण्याची शक्यता आहे. यावर मुख्यमंत्री कार्यालायाकडू काय स्पष्टिकरण येतेय हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.






