तारक मेहताच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट, ‘सुंदर’ नंतर ‘भिडे’ यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत आत्माराम तुकाराम भिडे ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते मंदार चांदवादकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या मंदार आणि त्यांचे कुटुंबीय होम क्वारंटाइन असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मंदार यांनी सांगितले की, “माझा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि मी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं घरातच उपचार घेत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या प्रत्येक नियमाचे काटेकोरपणे पालन करत आहे.”

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील सुंदर लाल म्हणजे मयूर वकानी यांची कोरोना टेस्टसुद्धा काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here