- भाजपाकडून आघाडी सरकार चले जावचा इशारा
- फक्त राजीनामाच नाही तर सखोल चौकशी ही करण्याची मागणी
शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे लेटर बॉम्ब मुळे विडख्यात सापडलेले गृहमंत्र्यांच्या राजीनामासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाजपाने आंदोलने सुरू केले आहेत याच मुद्याला धरून रविवारी शहादा येथे तहसील कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एसीपी सचिन वाजे यांना महिन्याला 100 कोटी रुपये मिळवून देण्याची मागणी केली आहे असा आरोप करीत अशा भ्रष्ट गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा व फक्त त्यांना पदावरून पायउतार करून चालणार नाही ,तर त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखिल यावेळी भाजपकडून करण्यात आली आहे
गृहमंत्र्यांच्या या लेटर बॉम्ब मुळे आता भारतीय जनता पक्षाने आघाडी सरकारावरही निशाणा साधला आहे ,आघाडी सरकार चले जावो असे म्हणत आघाडी सरकारचे निषेध केला आहे यावेळी मकरंद भाई पाटील – जिल्हा उपाध्यक्ष ,जितु भाऊ जमदाडे – माजी जिल्हा उपाध्यक्ष, राजीव देसाई – युवा मोर्चा शहर अध्यक्ष, लक्ष्मीकांत वसावे – अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष, किन्नरी ताई सोनार महिला -मोर्चा जिल्हाध्यक्ष अनामिका चौधरी ,जयेशकाका देसाई, वैभव सोनार ,कल्पनाताई, संगीता पाठक आदी उपस्थित होते.






