मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याच पार्शवभूमीवर राज्यातील अनेक शहरात, जिल्ह्यात तसेच अनेक भागात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.
कोरोनापासून वाचण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या तीन गोष्टींचे पालन करणे तयां त गरजेचे आहे ते म्हणजे, मास्क चा वापर करणे, हाथ धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे. मात्र सामान्य नागरिकांकडून या तिन्ही गोष्टींचे पालन होताना काही दिसत नाही आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र पोलिसांनी एक भन्नाट आणि मजेशीर ट्विट केले आहे. “मास्क लावणे, अंतर राखणे, हात स्वच्छ करणे, ‘तीन’ गोष्टी लक्षात ठेवूया, कोरोनाचा ‘खेळ’ संपवूया!” असे ट्वीट महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे. 
विशेष म्हणजे हे ट्वीट करताना महाराष्ट्र पोलिसांनी झी मराठीवर नव्याने सुरु होणाऱ्या रात्रीस खेळ चाले या मालिकेचा आधार घेतला आहे. या मालिकेत अण्णा नाईक पात्राला पोलिसांनी मास्क लावला आहे. त्याखाली मास्क वापरतास ना? असा प्रश्न पोलिसांनी विचारला आहे. या ट्वीटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.






