मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – इंग्लंड संघाला टी-२० मालिकेत हरवून आता भारतीय संघ एकदिवसीय मालिकेसाठी पुण्यात सज्ज झाली आहे. वनडे मालिकेला उद्याच म्हणजे २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे.
वनडे मालिकेतील सर्व सामने पुण्यातल्या गहुंजे या स्टेडिअमवर खेळवले जाणार आहेत. इंग्लंड संघाची भारत दौऱ्यावरील ही अखेरची मालिका असणार आहे. याआधी भारताने यजमान इंग्लंड संघाला कसोटी तसेच टी-२० मालिकेत चांगलाच पराभव केला आहे. या सीरिजसाठी विराटसेना पुण्यात दाखल झाली असून याबाबतची माहिती बीसीसीआयने ट्विट करत दिली आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया:
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.
इंग्लंडची 14 सदस्यीय टीम
इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियम लिविंगस्टोन, मॅट पर्किंसन, आदिल रशीद, बेन स्टोक्स, रीस टॉपले आणि मार्क वुड






