मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – एकीकडे शेतकरी कोरोना या महामारीच्या संकटामुळे त्रस्त असताना आता दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकरी हैराण झाले आहेत. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक शहरात, जिल्ह्यात , भागात पावसाची जोरदार हजेरी लागत शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
पुढचे तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काल रविवारी दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देशात वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे समोर येत आहे.






