मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा; एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी फेसबूक पोस्टमधून दिली माहिती

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पियोचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा अखेर उलगडा करण्यात एटीएसला यश आले आहे.

एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी स्वतः सोशल मीडियद्वारे ही माहिती दिली आहे. लांडे यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी सॅल्यूट ठोकणारा एक फोटो टाकला असून, मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या पोस्टमध्ये शिवदीप लांडे म्हणतात की, ‘अति संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मी आमच्या संपूर्ण एटीएस पोलिस फोर्समधील सहकाऱ्यांना सॅल्यूट करतो. त्यांनी गेल्या काही दिवसांत रात्रंदिवस एक केला आहे, त्यामुळे या प्रकरणाला न्याय मिळाला आहे. हे प्रकरणा माझ्या पोलिस करिअरमधील सर्वात अवघड प्रकरणांपैकी एक आहे’, असे शिवदीप लांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here