बॉलीवूडकरांच्या कोरोना पॉझिटिव्ह यादीत कार्तिक आर्यनची भर

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरनंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेता मनोज बायपेयी अशा अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली होती. यातच अजून देखील अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण होत चालली आहे यातच अभिनेता कार्तिक आर्यन याची कोरोना पॉझिटिव्ह लिस्टमध्ये वाढ झाली आहे.

कार्तिक आर्यनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत स्वत: त्याच्या चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे.

कार्तिकने एक प्लसचं चिन्ह असलेला फोटो शेअर केला आहे. “पॉझेटिव्ह हो गया. दुवा करो” असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. अनेक चाहत्यांनी कार्तिकला लवकर बरा हो असं कमेंटमध्ये सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here