मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – गृहमंत्री अनिल देशमुख १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत होम क्वॉरंटाईन होते, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दाव्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.
जर देशमुख क्वॉरंटाइन होते तर त्यांनी १५ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद कशी घेतली? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावरून काँग्रेसने फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सत्ता गेल्यानंतर मानसिक संतुलन बिघडते यांचे उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस, असे टीकास्त्र काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी सोडले आहे.
अमित शहा यांच्या काळात पुलवामा घडले. त्यावेळी शहा यांनी राजीनामा दिला का?, भाजपच्या सर्व मंत्र्यांचे न्यायाधीश फडणवीस कसे झाले होते?… भाजपने २०१४ पासून त्यांच्या खडसे सोडून कोणत्या मंत्र्यावर आरोप झाल्यावर चौकशी लावली?, असे प्रश्नावर प्रश्न डॉ. वाघमारे यांनी विचारले आहेत.






