नवी दिल्ली – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या करोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला आहे. रावत यांनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली होती. विशेष म्हणजे रविवारी नैनिताल जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला रावत यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना चाचणी करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.
“माझ्या करोना चाचणीचे निकाल पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती व्यवस्थित असून मला कसलाही त्रास होत नाहीय. मी डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मागील काही दिवसांमध्ये जे कोणी लोकं माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी कृपया काळजी घ्यावी आणि स्वत:ची चाचणी करुन घ्यावी,” असं ट्विट रावत यांनी केलं आहे.
मेरी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव आई है। मैं ठीक हूँ और मुझे कोई परेशानी नहीं है । डॉक्टर्स की निगरानी में मैंने स्वयं को आइसोलेट कर लिया है ।आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे निकट संपर्क में आयें हैं, कृपया सावधानी बरतें और अपनी जाँच करवाएं।
— Tirath Singh Rawat (@TIRATHSRAWAT) March 22, 2021
कालच हे अन्य एका कार्यक्रमामध्येही सहभागी झाले होते.होळीनिमित्त आयोजित कार्यक्रामध्ये त्यांनी हजेरी लावल्याचे फोटो ट्विट केले होते.
देहरादून स्थित चौधरी फार्म हाउस में भारतीय वैश्य महासंघ द्वारा आयोजित होली मिलन कार्यक्रम में प्रतिभाग किया। इस अवसर पर फाग उत्सव मनाया गया, जिसके अंतर्गत राधाकृष्ण बने कलाकारों के साथ फूलों की होली खेली और सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य का भी आनंद उठाया। pic.twitter.com/UJWa7cPlTA
— Tirath Singh Rawat (@TIRATHSRAWAT) March 21, 2021
रविवारी झालेल्या कार्यक्रमामध्येही रावत यांनी दोन वादग्रस्त वक्तव्य केली होती. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना, अमेरिकेने भारतावर २०० वर्ष राज्य केल्याचं म्हटलं होतं. करोना कालावधीमध्ये भारतामध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी नसते तर काय झालं असतं कोणीही सांगू शकत नाही. मात्र आपली परिस्थिती आतापेक्षा वाईट असती. पंतप्रधान मोदींनी आपल्याला खूप दिलासा देणारे निर्णय घेतले, अशा शब्दांमध्ये तीरथ सिंह रावत यांनी मोदींचे गुणगाण गायले.
पुढे बोलताना, “इतर देशांपेक्षा भारत करोना परिस्थिती अगदी छान पद्धतीने हाताळत आहेत. अमेरिका ज्यांनी आपल्यावर २०० वर्षे राज्य केलं, ज्यांनी जगावरराज्य केलं ते या करोनाचा सामना करताना डळमळत आहेत. अमेरिकेमध्ये ३.७५ लाखांहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. जगातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था असणाऱ्या इटलीमध्ये करोनामुळे ५० लाख जणांचा जीव गेला असून लवकरच तिथे नव्याने लॉकडाउन लागू होणार आहे,” असंही रावत म्हणाले.






