अंबानींना पाठवलेले धमकीचे पत्र प्रिंट केले तो प्रिंटरही सापडला
मुंबई (प्रतिनिधी)-
एनआयए टीमला सचिन वाझे यांच्या सीक्रेट डायरीत आर्थिक व्यवहाराचे अनेक पुरावे मिळाले आहेत. धमकी देण्यात आलेले ते पत्र ज्या प्रिंटरवर प्रिंट केलं होते तो प्रिंटरही जप्त करण्यात आला आहे.
अँटिलीया स्फोट केसचा तपास करत असताना एनआयएला सचिन वाझेंनकडून एक सीक्रेट डायरी मिळाली. ही डायरी वाझे यांनी सीआययु ऑफिसमध्ये लपवून ठेवली होती. वाझे आपल्या सीक्रेट गोष्टींचा ऑनलाईन रेकॉर्ड ठेवत नव्हते. या डायरीत आर्थिक व्यवहाराचे पुरावे मिळाले आहेत. यातील जास्त व्यवहार हे कॅश ट्रान्सफरचे आहेत.






