मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – सचिन वाजे काय ओसामा लादेन आहे का, असा प्रश्न विचारला होता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी. वाजेच्या बाबतीत आता पुरावे मात्र धक्कादायकरित्या समोर येत आहेत. ‘एनआयए’कडून सुरू असलेल्या तपासात ट्रायडेंट हॉटेलचे सिसिटीव्ही मिळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये सचिन वाजेच्या सोबत पाच बॅग्स दिसत आहेत.
सचिन वाजे खोटे आधार कार्ड दाखवून ट्रायडेंट हॉटेलमध्ये राहत होते, ही माहिती एनआयए च्या तपासातून समोर आली होती. एनआयएने आता ट्रायडेंट हॉटेलचे सिसिटीव्ही तपासले आहेत. ट्रायडेंटच्या सिसिटीव्हीत सचिन वाजे यांच्यासोबत पाच बॅग्स दिसत आहेत. त्यापैकी एका बॅगेत जिलेटीनच्या कांड्या असाव्यात असा संशय व्यक्त केला जातो आहे.
सचिन वाजे यांच्यासोबत नोटा मोजण्याचे मशीन तसेच एक महिला असल्याचे समजते. वाजे यांच्यासोबत असलेली महिला कोण, याचाही एनआयए शोध घेणार आहे.






