जर्मनीत लॉकडाऊन; 5 दिवस कठोर निर्बंध

बर्लिन – फ्रान्सपाठोपाठ आता जर्मनीतही कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल यांनी आज देशातील वेगवेगळ्या प्रांतामधील 16 नेत्यांसोबत कोरोना आढावा बैठक घेतली.

या बैठकीनंतर 1 एप्रिल ते 5 एप्रिल अशा पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा मर्केल यांनी केली. 1 ते 5 एप्रिल या कालावधीत जर्मनीत लॉकडाऊनचे कठोर निर्बंध असतील. 3 एप्रिलला फळे, भाजीपाला आणि अन्नधान्याची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळाचे सामने भरविण्यास 18 एप्रिलपर्यंत बंदी असणार आहे.

मर्केल यांनी देशातील नेत्यांसोबत झालेल्या 12 तासांच्या बैठकीनंतर लॉकडाऊनबाबतचा हा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here