मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना दुसर्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. याआधी गेल्या वर्षी जूनमध्ये त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
धनंजय मुंडेंनी ट्विटरवर म्हटलं आहे, ‘माझी आज दुसर्यांदा करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी.’
माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 23, 2021






