मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – सोनी सब वाहिनीवरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालणारा हा शो आता लवकरच प्रेक्षकांसाठी अॅनिमेटेड स्वरूपात दिसणार आहे.
सोनीने मंगळवारी याबाबत माहिती दिली व या नवीन शोचा प्रोमो इंस्टाग्रामवर शेअर केला.शोच्या या अॅनिमेटेड अवतारात टप्पू, जेठालाल, दयाबेन, बाबूजी आणि इतरही सर्व पात्रे दिसणार आहेत. विशेष म्हणजे या शोला निरोप घेणारी दयाबेन उर्फ दिशा वकानी या अॅनिमेटेड मालिकेत दिसणार आहे. या शोमधील असलेल्या पात्रांमुळे या शोचा टीआरपी खूप जास्त आहे. शोचे अॅनिमेटेड व्हर्जन सोनी टीव्हीचे चॅनल ‘सोनी ये’वर प्रसारित होईल.






