बंगालमध्ये पंतप्रधानांची रॅलीदरम्यान कार्यकर्त्याच्या पाया पडून केले अभिवादन

कांथी (पश्चिम बंगाल) – येथे बुधवारी निवडणूक रॅलीदरम्यान एक अनोखे दृष्य पाहायला मिळाले. मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले होते, तेव्हा एका भाजप नेत्याने त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोदींनी त्या कार्यकर्त्याला पाया पडण्यापासून रोखले आणि स्वतः त्या कार्यकर्त्याला पाया पडून अभिवादन केले. पंतप्रधान ज्या नेत्याच्या पाया पडले, ते अनूप चक्रवर्ती कांथीचे भाजपाध्यक्ष आहेत.

या घटनेचा एक व्हिडिओ भारतीय जनता पक्षाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. भाजपने व्हिडिओ पोस्ट करत लिहीले की, भाजप एक अशी सुसंस्कृत संघटना आहे, जिथे कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांबद्दल समान संस्काराची भावना आहे.

बंगालमध्ये 8 टप्प्यात निवडणुका
पश्चिम बंगालमध्ये यंदा 8 टप्प्यात मतदान होणार आहे. 294 जागा असलेल्या विधानसभेसाठी मतदान 27 मार्च (30 सीट), 1 एप्रिल (30 सीट), 6 एप्रिल (31 सीट), 10 एप्रिल (44 सीट), 17 एप्रिल (45 सीट), 22 एप्रिल (43 सीट), 26 एप्रिल (36 सीट), 29 एप्रिल (35 सीट) ला होईल आणि निकाल 2 मे रोजी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here