मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – आजपासून (२४ मार्च) ते १५ जूनपर्यंत मुंबईतील महत्वाचा एक पूल रहदारीकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. लालबाग उड्डाणपूल रात्री ते सकाळी 6 वाजता या कालावधीत वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
मुख्य रहदारीच्या या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, हा उड्डाणपूल बंद ठेवण्यात येणार असल्याने परळ पूल आणि परळ टी. टी. जंक्शनकडून येणारी आणि भायखळ्याकडे जाणारी दक्षिण वाहिनीवरील सर्व वाहनांची वाहतूक लालबाग उड्डाणपुलाच्या खालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने भायखळ्याच्या दिशेने वळवण्यात आली आहे.
भायखळा मार्केटकडून लालबाग उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या वाहतुकीला देखील पर्याय देण्यात आला आहे. त्यानुसार ही वाहतूक उड्डाणपुलाच्या खालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने परळच्या दिशेने जाईल. यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये याची खबरदारी घेत भायखळा मार्केटकडून लालबाग उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या वाहतुकीला देखील पर्याय देण्यात आला आहे. त्यानुसार ही वाहतूक उड्डाणपुलाच्या खालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने परळच्या दिशेने वळविण्यात आली आहे.






