निकिता तोमर हत्याकांड प्रकरणात दोन आरोपी दोषी, तर एकाची सुटका

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – आज निकिता तोमर हत्याकांड प्रकरणात फास्टट्रॅक ने आपल्या निकाल जाहीर केला असून आरोपी तौसीफ आणि त्याचा मित्र रेहानला दोषी ठरवलं आहे. तर तिसरा आरोपी अजरुद्दीन, ज्याच्यावर हत्यार मिळवून दिल्याचा आरोप होता, कोर्टाकडून त्याची सुटका करण्यात आली.

हरियाणाच्या वल्लभगड इथं २६ ऑक्टोबर २०२० मध्ये निकिताची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. निकिता ही B.Comच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. आपल्या महाविद्यालयातून परीक्षा देऊन ती परतत असताना तिघांनी तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. निकिताने विरोध करताच गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली.

हत्येचा हा संपूर्ण प्रकार महाविद्यालयात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. फरीदापास पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत तौसीफ, रिहान आणि अजरुद्दीनला अटक केली होती. २६ मार्चला दोषींच्या शिक्षेची सुनावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here