मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर)
महाराष्ट्र कल्चरल सेंटर ही प्रयोगकलांच्या क्षेत्रात कार्यरत असलेली पुण्यातील एक अग्रगण्य व मान्यवर संस्था आहे. ‘रंगसेतू अभ्यासवृत्ती’ हा संस्थेचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. नाट्य, दृश्यकला, संगीत व नृत्य या कलाक्षेत्रांत एक व्यावसायिक म्हणून जम बसवू पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण कलाकारांसाठी महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेने जाहीर केलेली ही एक वर्षाची विशेष अभ्यासवृत्ती आहे.
‘रंग’ ही संकल्पना भरतमुनीच्या नाट्यशास्त्रापासून प्रयोगकलांच्या संदर्भात वापरली गेली आहे, तसेच दृश्यकलांतही ‘रंग’ हा घटक किती महत्त्वाचा आहे, हे आपण जाणतोच. तर, ‘सेतू’ म्हणजे दोन तीर जोडणारा. पूर्वअनुभव किंवा कलाशिक्षण, सर्जनात्मक काम आणि प्रत्यक्ष व्यवसाय यांचा दुवा सांधणारी ही अभ्यासवृत्ती आहे, म्हणून हिचे नाव ‘रंगसेतू’.
नाट्य (लेखन, दिग्दर्शन, अभिनय), दृश्यकला (चित्र, शिल्प, इंस्टॉलेशन, अन्य) संगीत (गायन, वादन, संगीत रचना), नृत्य (सर्व भारतीय अभिजात नृत्यशैली, आधुनिक व प्रायोगिक नृत्य प्रकार) या प्रकारांत कार्यरत असलेल्या, महाराष्ट्रातील उदयोन्मुख कलाकारांना या अभ्यासवृत्तीसाठी अर्ज करता येईल. पूर्ण महाराष्ट्रातून अर्ज मागवून, त्यांचे परीक्षण करून प्रत्येक कलाक्षेत्रातील पाच व्यक्तींची निवड करून त्यांना मुलाखतीसाठी पाचारण केले जाईल.
निवड झालेल्या कलाकारास दरमहा रु. दहा हजार (पूर्ण वर्षात रु. एक लाख वीस हजार) अशी अभ्यासवृत्ती दिली जाईल. दर तीन महिन्यांनी कलाकाराने आपण केलेल्या सर्जनात्मक कामाचा वृत्तांत / आढावा पाठवणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या समितीने ह्या वृत्तांतास मान्यता दिल्यानंतर अभ्यासवृत्तीचा पुढील हप्ता देण्यात येईल. अशा प्रकारे एकूण चार हप्त्यांमध्ये ही अभ्यासवृत्ती दिली जाईल. अभ्यासवृत्तीच्या अखेरीस सर्व कलाकारांनी या अभ्यासवृत्तीच्या कालावधीत केलेल्या सर्जनात्मक कामावर आधारित विशेष प्रस्तुती (नाट्याविष्कार, प्रदर्शन, संगीत/नृत्य मैफल, व्हिडीओ/ ऑडीओ प्रॉडक्शन, इ. प्रकारे) महाराष्ट्र कल्चरल सेंटरमध्ये करणे बंधनकारक असेल.
अर्जदाराची पात्रता:
१. वयोगट: २२ ते ३५ वर्षे
२. अर्जदाराचा जन्म वा शिक्षण महाराष्ट्रात झाले असावे / गेली किमान ७ वर्षे महाराष्ट्रात त्याचे वास्तव्य असावे.
३. अर्जदारास स्वत:च्या कलाक्षेत्रातील औपचारिक / अनौपचारिक शिक्षण/ पदवी आणि किमान ७ वर्षांचा अनुभव असावा
४. अर्जदार स्वत:च्या कलाक्षेत्रात सध्या कार्यरत असणे आवश्यक आहे तसेच तो कोणत्याही स्वरूपाची पूर्ण वेळ नोकरी किंवा अन्य व्यवसाय करणारा नसावा.
या अभ्यासवृत्तीसाठी खाली दिलेल्या गूगल फॉर्म मार्फत अर्ज पाठवायचा असून अर्जासह आपले छायाचित्र, तसेच आपल्या कलाक्षेत्रात आधीच्या केलेल्या कामाचे नमुने (लेखन/ फोटो/ व्हिडीओ/ ऑडीओ/ यूट्युब लिंक्स) जोडणे आवश्यक आहे. गूगल फॉर्म अर्ज पुढील लिंकवर उपलब्ध आहे –
नाट्य- shorturl.at/dknwF
संगीत- shorturl.at/xGHJL
नृत्य- shorturl.at/zGH48
दृश्यकला- shorturl.at/Xklqr
महत्वाच्या तारखा:
१. अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख: दि. २५ एप्रिल २०२०१
२. प्रत्यक्ष मुलाखती: दि. १५ व १६ मे २०२१
३. अंतिम निवडीची घोषणा: दि. १ जून २०२१
४. अभ्यासवृत्ती प्रदान समारोह: दि. ६ जून २०२१
अर्जासंबंधी काही प्रश्न/शंका असल्यास संपर्काचा ईमेल पत्ता :-
नाट्य [email protected]
संगीत [email protected]
नृत्य [email protected]
दृश्यकला [email protected]
दूरध्वनी: 9850839917 (श्री. प्रमोद काळे)






