निसर्गमित्र जळगावची चिमणी गणना पोहचली बहरीनपर्यंत…

जळगाव (प्रतिनिधी सिध्दांत सोनवणे) – एरवी चिऊताईचा चिवचिवाट सर्वत्र दिसायचा. अंगणात सकाळी चिऊताई यायचीच. पण, वाढत्या सिमेंटच्या जंगलात चिऊताई दिसेनाशी झाली. म्हणूनच जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ व शिल्पा गाडगीळ यांच्या निसर्गमित्र या संस्थेतर्फे चिमणी गणनेचे आयोजन करण्यात आले होते.

या चिमणी गणनेत ३ हजार ५९३ चिमण्यांची नोंद करण्यात आली. या गणनेचे वैशिष्ट्य म्हणजे निसर्गमित्रच्या आवाहनाला केवळ जळगावातूनच नव्हे तर देशाबाहेरील बहरीन येथून देखील प्रतिसाद मिळाला आहे.

pritam tulshibagwale bharin
प्रीतम तुळशीबागवाले
या अभिनव उपक्रमात बहरीन येथील प्रीतम तुळशीबागवाले यांनी सहभाग नोंदवत बहरीन येथील मनामामधील जुफैर भागात चिमणी गणना करुन २१ मादी चिमण्या व १३ नर चिमण्यांची गणना केली आहे. तसेच त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यातून फोटो काढूनदेखील पाठविले आहेत. या उपक्रमाला देशाबाहेरुन प्रतिसाद मिळाल्याने, गाडगीळ दांम्पत्याच्या पक्षी विषयक कार्याला एक नवा आयाम मिळाला आहे.

 

 

या चिमणी गणनेत महाराष्ट्रातील चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, जळगाव, धुळे, नाशिक, परभणी, नगर, सोलापूर, नाशिक, पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, सांगली, सातारा तसेच महाराष्ट्राबाहेरील इंदूर, रायपूर, गोवा राज्यातील फोंडा तर देशाबाहेरील बहरीन सारख्या देशातून ४१ ठिकाणचे १५७ पक्षीप्रेमी सहभागी झाले होते.

यातील ११९ सदस्यांनी १७०० नर चिमण्या आणि १४६१ मादी चिमण्या अशी नोंद घेतली असून, एकूण ३ हजार १६१ चिमण्यांची नोंद करण्यात आली आहे. यातील २४ ठिकाणी चिमण्या आढळून आल्या नाहीत.

google-form-data

या गणनेविषयी आवाहन करताना कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून नागरिकांनी घराच्या बाहेर न पडता आपल्या घरातील बागेत, गच्चीत वा बाल्कनीतून दिसणाऱ्या चिमण्यांची गणना करण्याचे आवाहन पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी केले होते. यासाठीचा गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला होता.

या उपक्रमाबाबत माहिती देताना राजेंद्र गाडगीळ म्हणाले की, या गणनेतून स्पष्ट होते की, चिमण्या नाहीश्या झालेल्या नाहीत तर त्या वाढत्या शहरीकरणाने वेशीबाहेर ढकलल्या गेल्या जात आहे. शहराबाहेर जिथे वस्ती विरळ आहे तिथे चिमण्या हमखास दिसतात. पक्ष्यांच्या मुबलक अन्न, निवास आणि सुरक्षित प्रजनन तीन मुलभूत गरजा ज्या भागात असतील त्या भागात त्या रहदारीच्या ठिकाणीदेखील स्वतःला जुळवून घेतील.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here