मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – एकीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण अधिक वाढत आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रासाठी एक कौतुकास्पद बातमी समोर आली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाची लस देणा-या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली आहे.
सध्या तब्बल 2,47,299 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र त्याचबरोबर दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यात कोरोना लसीकरणाचे मोहिम देखील युद्धपातळीवर सुरु असून अधिकाधिक लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे.
बुधवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूची सक्रिय प्रकरणे 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त आहेत. हे जिल्हे- पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बेंगळुरू अर्बन, नांदेड, जळगाव, अकोला असे आहेत. या 10 जिल्ह्यांपैकी 9 जिल्हे महाराष्ट्रातील आणि एक जिल्हा कर्नाटकचा आहे. केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाले की, महाराष्ट्र आणि पंजाब ही दोन राज्ये आमच्यासाठी गंभीर चिंतेची बाब आहे.






