केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीवर राष्ट्रपतींनी विचार करु, असं उत्तर दिल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.

रामदास आठवले माध्यमांशी संवाद साधत म्हणाले की, महाराष्ट्रात परिस्थिती बिघडत असून खूप गंभीर घटना समोर येत आहेत. अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याचं काम एक पोलीस अधिकारी करतो. गृहमंत्री सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटी मिळाले पाहिजेत असं सांगतात. पहिल्यांदाच असं होत आहे त्यामुळेच मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाला थोपवण्यात अपयशी ठरलं असल्याचे देखील रामदास आठवले यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here