नवी दिल्ली – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी ट्विटरवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिला आणि वयस्कर व्यक्तींना सन्मान दिला जात नाही अशी टीका केलीय. तसेच यापुढे आपण राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाला ‘संघ परिवार’ म्हणणार नाही, असे देखील म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, माझ्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित संघटनांना संघ परिवार असं म्हणणं योग्य ठरणार नाही. परिवार (कुटुंब) म्हटल्यावर तिथे महिलांचा आणि वयस्कर व्यक्तींचा आदर केला जातो. या व्यक्तींबद्दल आदर आणि प्रेमाची भावना असते. असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये घडत नाही. त्यामुळे मी यापुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संघ परिवार म्हणणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मेरा मानना है कि RSS व सम्बंधित संगठन को संघ परिवार कहना सही नहीं- परिवार में महिलाएँ होती हैं, बुजुर्गों के लिए सम्मान होता, करुणा और स्नेह की भावना होती है- जो RSS में नहीं है।
अब RSS को संघ परिवार नहीं कहूँगा!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 25, 2021
उत्तर प्रदेशमध्ये ख्रिश्चन महिला पाद्र्यांवर धर्मप्रसार करत असल्याचा आरोप करत ट्रेनमधून उतरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी हे ट्विट केलं आहे.






