राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना येत्या आठ दिवसांत मार्च अखेर पर्यंतचे मानधन अदा होणार

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची घोषणा

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – राज्यातील वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजनेतील सुमारे 28 हजार पात्र मानधनधारकांच्या खात्यात येत्या आठ दिवसांत मार्च अखेर पर्यंतचे मानधन जमा होईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले आहे.

श्री देशमुख यांनी पुढे सांगितले की, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचे मानधन अदा करण्यात येत आहे. यासाठी 18 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून वारसदार व नव्याने अंतर्भूत झालेल्या काही कलाकारांनाही मानधन अदा होईल. कोविड च्या पार्श्वभूमीवर राज्यातील कलाकारांच्या पाठीशी सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच राहील असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी राज्य शासनाकडून ही योजना सन १९५५ पासून राबवण्यात येते. अलीकडेच या मानधनधारकांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून सद्यस्थितीत श्रेणीनिहाय (अ श्रेणी रुपये 3150, ब श्रेणी रुपये 2700, क श्रेणी रुपये 2250 ) मानधन दरमहा अदा करण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here