हत्तीकणबस येथे श्री बसवेश्वर प्रिमियम लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन संपन्न

अक्कलकोट:(तालुका क्राइम रिपोर्टर वैदपाशा तडमुड)- श्री केदार बिराजदार मित्र मंडळ आयोजित बसवेश्वर प्रिमियम लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन प्रशांत देवरू महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात दहिटणे ग्रामपंचायत सदस्य रमेश स्वामी यांच्याहस्ते आणि युवानेते विनोद बिराजदार (सलगर), गुरु उण्णद (प्रसिध्द अडत व्यापारी ) राहुल दादा साळुंखे (चिक्केहळ्ळी) शरण ढेपे शिवा संघटना तालुका उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.

प्रमुख मान्यवरांचे स्वागत व सत्कार केदार बिराजदार यांच्याहस्ते करण्यात आले.रमेश स्वामी सर यांनी मानवी जीवनात खेळाचे महत्व व सोशल मिडीयामुळे हरवत चाललेली मैदानी खेळ यावर आपले मनोगत व्यक्त करुन केदार बिराजदार यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेबद्दल व त्यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

याप्रसंगी हत्तीकणबस येथील सर्व प्रतिष्ठित सन्माननीय पदाधिकारी व युवक क्रिडाप्रेमी उपस्थित होते.उपस्थितांचे आभार केदार बिराजदार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here