मुंबई (कार्यालय प्रतिनिधी)– रेल्वे भरती मंडळ पश्चिम रेल्वेने दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. रेल्वेने जी अधिसूचना जरी केली आहे ती इंटर्नशिपसाठी आहे.
तुमचे शिक्षण १० वीपर्यंतच झाले असेल आणि तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल किंवा इंटर्नशिप करण्याची तुमची इच्छा असेल तर रेल्वे तुम्हाला संधी द्यायला तयार आहे. आहे त्या शिक्षणात चांगल्या खात्यात नोकरी मिळत असेल तर आनंदच होईल ना तुम्हाला ?






