नाशिक जिल्ह्यात करोना संसर्गाचा उद्रेक : २ हजार ९९४ पॉटिव्ह रुग्ण आढळले

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोना संसर्गाचा उद्रेक कायम असून पुन्हा एकदा पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या तीन हजाराच्या घरात गेली. गुरुवारी (दि.२५) २ हजार ९९४ रुग्ण आढळले. दरम्यान मागील दोन दिवसाच्या तुलनेत रुग्णसंख्येत तीनशे ते चारशे संख्येने रुग्णसंख्या घटल्याने प्रशासनाला काहिसा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात वाढता करोना पाॅझिटिव रुग्णाच्या संख्येत भर पडत असून जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. मागील चार दिवसांपासून रोज करोना रुग्णाच्या आकडयाने तीन हजारी आकडा पार केला होता. पण काल हा आकडा तीन हजाराच्या खाली उतरला. तरी देखील ही वाढ चिंताजनक असून करोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असल्याचे भीतीदायक चित्र आहे.

गुरुवारी नाशिक मनपा हद्दित १ हजार ७३९ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले. जिल्हाप्रशासनाने कठोर निर्बंध जारी केले असले तरी करोना अटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. मृत्यूचा आकडाही वाढत असून आज बारा जणांना करोनाने प्राण गमवावे लागले.

करोना आकडेवारी – नाशिक मनपा – १७३९, नाशिक ग्रामीण – ११६०, मालेगाव मनपा – ४७, जिल्हाबाह्य – ४८
करोना मृत्यू – नाशिक मनपा – ५, नाशिक ग्रामीण – १, मालेगाव मनपा – ४, जिल्हाबाह्य – २

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here