अभिनेता मिलिंद सोमणला करोनाची लागण

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – देशभरात पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव वाढू असून, बॉलिवूडमध्येही अनेक कलाकारांना करोनाची लागण होताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण यांना करोनाची लागण झाली आहे. स्वतः मिलिंद यांनी एक पोस्ट शेअर करत यासंबंधीची माहिती दिली.

ट्विटर पोस्टवर मिलिंद यांनी लिहिले की, ‘करोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. स्वतःला क्वारन्टाइन केलं आहे.’ मिलिंद यांच्याआधीही अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली आहे. आमिर खान, आर माधवन, रणबीर कपूर, मनोज वाजपेयी, कार्तिक आर्यन, सिद्धांत चतुर्वेदी, तारा सुतारिया आणि सतीश कौशिक यांसारखे अनेक कलाकार कोविड पॉझिटिव्ह आले आहेत.

एकाकडे एकामागोमाग एक कलाकार कोविड पॉझिटिव्ह होत आहेत तर अनेक ज्येष्ठ कलाकार लसीकरण करून घेताना दिसत आहेत. शर्मिला टागोर, धर्मेंद्र, राकेश रोशन, अलका याग्निक, सतीश शाह, हेमा मालिनी, जॉनी लीवर, परेश रावल, जितेंद्र, कमल हसन, मोहन लाल, नागार्जुन यांसारख्या दिग्गज कलाकारांनी करोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करून घेतले आहे.

दरम्यान, अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याने चित्रपटाचं चित्रीकरणही पुढे ढकलण्यात येत आहे. तर दुसरीकडे करोनामुळे होणारं नुकसान पाहता अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात येत आहे. हाथी मेरे साथी सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं असून सलमान खानच्या राधे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here