परमवीर सिंग यांच्या लेटरबाँम्बसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – परमवीर सिंग यांच्या लेटरबाँब संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात शरद पवार यांच्या भूमिकेचीही चौकशी होण्याची गरज आहे, असा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे.

९० वर्षीय रिबेरो यांच्यामार्फत चौकशीचा सल्ला देण्यामागे पवारांचा हेतू काय?, असा प्रश्न याचिकेत विचारला आहे.घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणाची सीबीआय किंवा ईडीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश देण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.

दरमहा १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने पीएमएलए अंतर्गत सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या संपत्तीवर जप्तीचीही याचिकेत मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here