पुणे शहरात खरंच होणार का लॉकडाऊन?

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – राज्यातील पुणे शहरात कोरोनाचा उद्रेक असताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महापौर, नगरसेवक आणि अन्य अधिकार्‍यांसोबत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

यामध्ये अजित पवारांनी पुणेकरांना नियमावलीचं पालन करण्यासाठी आवाहन केले असून यावेळेस येत्या काही दिवसांत कोरोनाची रूग्णसंख्या आटोक्यात आली नाही तर १ एप्रिलनंतर लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध नाईलाजास्तव घ्यावे लागतील असे यावेळी त्यांनी सांगितले आहे.

पुणे शहरामध्येही कोरोनाचा वाढता विळखा पाहाता खाजगी हॉस्पीतलचे ५०% बेड्स रिझर्व्ह कारण्याचे आदेश दिले आहेत. तसेच लसीकरणाला वेगवान करण्याचेदेखील आदेश दिले आहेत. पुणे शहरात काल रात्री गेल्या २४ तासात ६,४३२ जणांना कोरोना संक्रमण झाले आहे. २,८०८ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर ४२ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here